About Us

पाटी पेन्सिल : शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि करिअरची गुरुकिल्ली !
पाटी पेन्सिल मध्ये तुमचं स्वागत आहे!
नमस्कार ! ही website महाविद्यालयीन विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी समर्पित आहे. आमचा उद्देश म्हणजे तुमच्या शैक्षणिक प्रवासात मार्गदर्शन करणे, परीक्षांसाठी योग्य तयारी कशी करावी हे शिकवणे आणि तुमची स्वप्नं साकार करण्यासाठी प्रेरणा देणे. या website द्वारे आम्ही विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, ऑलिंपियाड (Olympiad), १० वी (SSC) व १२ वीच्या (HSC) विद्यार्थ्यांसाठी अभ्यास टिप्स, तसेच MPSC, UPSC, SSC व इतर स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेली माहिती, चालू घडामोडी आणि वेळेचे व्यवस्थापन यावर उपयुक्त मार्गदर्शन देत आहोत. अभ्यास प्रभावीपणे कसा करावा, हे शिकवतानाच, योग्य नियोजन आणि मानसिक तयारी कशी करावी याचीही दिशा या मंचावरून मिळेल. अभ्यासाच्या सवयी सुधारण्यापासून ते करिअरची योग्य दिशा निवडण्यापर्यंत, तुम्हाला इथे उपयुक्त माहिती आणि व्यावहारिक सल्ला मिळेल. तुम्ही लक्ष केंद्रित ठेवून, प्रेरित राहून यशस्वी व्हावं, यासाठी आम्ही सदैव तुमच्यासोबत आहोत.
चला तर मग, तुमची ध्येयं सत्यात उतरवण्यासाठी एकत्र काम करूया!
शिकणं म्हणजे केवळ पुस्तकं वाचणं नव्हे, तर जगण्याला एक अर्थ देणं असतं – आणि हाच विचार मनात ठेवून “पाटी पेन्सिल” या website ची सुरुवात झाली.
स्पर्धा परीक्षा व अभ्यास टिप्स (UPSC, MPSC, Exam, Competitive, Study Tips)
या ‘पाटी पेन्सील’ (https://patipencil.com) या website च्या माध्यमातून आम्ही…
- MPSC, UPSC, SSC व इतर स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेली माहिती
- चालू घडामोडी
- वेळेचे व्यवस्थापन
…यावर उपयुक्त मार्गदर्शन देत आहोत.
अभ्यास प्रभावीपणे कसा करावा, हे शिकवतानाच, योग्य नियोजन आणि मानसिक तयारी कशी करावी याचीही दिशा या मंचावरून मिळेल. अभ्यासाच्या सवयी सुधारण्यापासून ते करिअरची योग्य दिशा निवडण्यापर्यंत, तुम्हाला इथे उपयुक्त माहिती आणि व्यावहारिक सल्ला मिळेल.
खूप वेळा असं होतं की विद्यार्थ्यांकडे मोठी स्वप्नं असतात, ध्येयं उच्च असतात. मेहनत करायची तयारी असते, पण योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे ते थांबतात. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये अफाट क्षमता आहे – त्यांना फक्त योग्य दिशा दाखवणारा कोणी तरी हवा असतो. आम्ही इथे आहोत, त्यांच्या आयुष्याला योग्य वळण देण्यासाठी, त्यांना यशाची चव चाखायला लावण्यासाठी. UPSC, MPSC ही परीक्षादेखील अशक्य नाहीत – जर योग्य पद्धतीने अभ्यास केला, तर नक्की यश मिळू शकतं.
परदेशात शिक्षण
बरेच विद्यार्थी परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा बाळगतात, पण सुरुवात कुठून करावी, कोणती युनिव्हर्सिटी निवडावी, कोणता कोर्स घ्यावा, वित्तीय मदत कुठून मिळेल, शिष्यवृत्ती, व्हिसा – असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात असतात. पण त्यांना माहितच नसतं की अनेक देश आणि विद्यापीठं शिष्यवृत्ती देतात. आम्ही इथे आहोत, त्यांना हे सगळं समजावून सांगण्यासाठी आणि त्यांच्या स्वप्नांना दिशा देण्यासाठी.
करिअर मार्गदर्शन व सरकारी योजना
यासोबतच आम्ही…
- शासकीय योजना
- शिष्यवृत्तीची माहिती
- नोकरीविषयक अपडेट्स
- करिअर मार्गदर्शन
…देखील देत आहोत.
शालेय स्तरावरील मार्गदर्शन (Olympiad, Scholarship)
या website द्वारे आम्ही शालेय विद्यार्थ्यांसाठी…
- शिष्यवृत्ती (Scholarship) व
- ऑलिंपियाड (Olympiad) परीक्षांचे मार्गदर्शन
…देत आहोत.
सर्व काही एकाच छताखाली
अभ्यासासाठी लागणारे नोट्स, परीक्षेची तयारी – सगळं काही एकाच छताखाली! माध्यम कोणतेही असो – इंग्रजी किंवा मराठी, आणि बोर्ड कुठलाही असो – CBSE, ICSE किंवा राज्य मंडळ, जर योग्य मार्गदर्शन मिळालं आणि अभ्यासाची दिशा ठरली, तर यशाची क्षितिजंही लांब वाटत नाहीत. तुम्ही लक्ष केंद्रित ठेवून, प्रेरित राहून यशस्वी व्हावं, यासाठी आम्ही सदैव तुमच्यासोबत आहोत.
चला, शिकण्याची गोडी जपूया… आणि आपलं स्वप्नं उंच नेऊया!
संस्थापक, लेखक व संपादक: सागर पुदाले

सागर पुदाले हे एक प्रतिभावान लेखक, अभ्यासक, आणि शिक्षक आहेत. “पाटी पेन्सिल” (patipencil.com) या लोकप्रिय शैक्षणिक प्लॅटफॉर्मचे ते संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत.
शिक्षण क्षेत्रात त्यांना १0 वर्षांहून अधिक काळ शिकवण्याचा अनुभव आहे. त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथून M.A. (इंग्रजी) मध्ये सुवर्णपदकासह पदवी (२०१३ आणि २०१५) प्राप्त केली आहे. शिक्षण आणि संशोधनाकडे त्यांचा विशेष कल असून, त्यांनी इंग्रजी साहित्यात NET आणि SET या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत.
शिक्षणासोबतच लेखन, विचार, आणि मार्गदर्शन या क्षेत्रांमध्येही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. “पाटी पेन्सिल” या त्यांच्या व्यासपीठाद्वारे ते विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, UPSC/MPSC तयारी, करिअर निवड, शिष्यवृत्ती, चालू घडामोडी, आणि सरकारी योजनांसारख्या अनेक विषयांवर उपयुक्त मार्गदर्शन करतात.
त्यांच्या लेखनात सामाजिक वास्तव, राजकीय संदर्भ, आणि मानवी भावभावना यांचा अनोखा संगम पाहायला मिळतो. त्यांनी दोन पुस्तके लिहिली आहेत:
- “Beyond Borders: Navigating National Interests in a Globalized Era” हे त्यांचे नॉन-फिक्शन पुस्तक जागतिकीकरण, राष्ट्रहित आणि ओळख राजकारण यांसारख्या विषयांवर सखोल आणि संतुलित मांडणी करते.
- “Waiting Ocean: Whispering Sand” या त्यांच्या कादंबरीत स्मृती, एकाकीपणा, आणि मानवी भावभावनांची हळुवार आणि कवितासदृश मांडणी आहे.