१०वी जवळ येत असताना बऱ्याच पालकांची आपल्या मुलांच्या करिअरबाबत तयारी सुरू होते. आणि मग मोहीम सुरु होते आपल्या पाल्यासाठी – Best Old and New Courses After 10th and 12th Class शोधण्याची! पण खरं सांगायचं तर, हे निर्णय मुलांनी स्वतंत्रपणे घ्यायला हवेत, कोणाच्याही दबावाखाली नाही. मित्र काय करतोय, पालक काय सांगतात यापेक्षा , मला काय वाटत, हे महत्वाच आहे. काही पालक तर मुलांच्या जन्माआधीच त्यांनी काय करायचंय ते ठरवून ठेवतात, तर काही त्यांना थोडं स्वातंत्र्य देतात. १०वी म्हणजे खरं तर आयुष्यातील एक महत्वपूर्ण वळण आहे. इथूनच पुढचं सगळं ठरतं. म्हणूनच हे निर्णय विचारपूर्वक घ्यायला हवेत, फक्त मित्र, मार्क्स किंवा नातेवाईकांच्या प्रभावाने नाही.

आज जग खूप वेगाने बदलतंय. माहिती आपल्या बोटांवर आहे, तरी अनेकजण अजूनही गोंधळलेलेच आहेत. आज ज्या गोष्टी उत्तम वाटतात, त्या काही वर्षांनी उपयोगी ठरणार नाहीत असंही होऊ शकतं. म्हणूनच Arts, B.Ed, D.Ed किंवा इंजिनिअरिंगसारख्या पारंपरिक शाखांमध्ये डिग्री घेऊनही बरेच जण बेरोजगार आहेत.त्यामुळे फक्त मार्क्स, पालकांची अपेक्षा किंवा मित्र काय करत आहेत, यावरून करिअर ठरवू नये. चांगलं भविष्य घडवायचं असेल, तर योग्य माहिती घेऊन, शहाणपणाने निर्णय घ्यायला हवा. चला तर मग पाहूया काही Best Old and New Courses After 10th and 12th Class जे तुमचं भविष्य घडवू शकतात.
पारंपरिक आणि आधुनिक दोन्ही क्षेत्रांचा आढावा घेऊया:
Arts, Science आणि Commerce या पारंपरिक शाखा आजही महत्त्वाच्या आहेत का? हो, आजही Science इनोव्हेशनला चालना देतं, Commerce बिझनेस आणि finance ला आधार देतं. आणि Arts – हे तर creativity आणि विचारक्षमतेला आकार देतं. जरी नवीन कोर्सेस आले असले, तरी या शाखा अजूनही मजबूत करिअर देऊ शकतात. या लेखात आपण पारंपारिक (traditional) आणि आधुनिक (path breaking) असे दोन्ही पर्याय पाहणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या मुलांना एक चांगले क्षेत्र निवडता येईल.

Arts: एक undervalued पण Best Course after 10th and 12th
अनेक जण असं समजतात कि Arts ही शाखा science किंवा commerce पेक्षा कमी महत्त्वाची आहे. पण जेव्हा त्यांना समजतं की या क्षेत्रात creativity, विचारक्षमता आणि करिअरचे बरेच पर्याय आहेत, तेव्हा त्यांचा दृष्टिकोन बदलतो.
पारंपरिक आणि परिचित कोर्सेस:
1. MPSC (Maharashtra Public Service Commission):
- महाराष्ट्रातील सरकारी पदांसाठी स्पर्धा परीक्षा.
- Police officer, administrative officer अशा पदांसाठी संधी.
- History, geography आणि current affairs यावर भर.
2. UPSC (Union Public Service Commission):
- IAS, IPS, IFS यांसारख्या केंद्रीय सेवा पदांसाठी परीक्षा.
- अत्यंत स्पर्धात्मक आणि व्यापक अभ्यास लागतो.
- Polity, economics आणि general knowledge वर तयारी लागते.
3. इतर Arts संबंधित courses:
- B.A. – History, Sociology, Psychology, Literature वगैरे विविध specializations.
- BFA – Visual arts, design आणि media क्षेत्रासाठी.
- B.Des – Fashion, interior किंवा industrial design साठी उपयुक्त.
- Fashion Designing – कपडे डिझाइन, मार्केटिंग यामध्ये करीयर.
- Journalism & Mass Communication – Media, PR, आणि writing field मध्ये संधी.
- Performing Arts – Theatre, music, dance यामध्ये करिअर घडवणं शक्य.
- B.P.Ed – Sports, fitness आणि management क्षेत्रासाठी.

Creativity आणि कलाविषयक क्षेत्रातले Courses
1. Acting:
- Bachelor of Performing Arts (BPA): Acting, theatre, stage performance साठी.
- Diploma in Acting: Voice modulation, expression, stage presence यावर प्रॅक्टिकल ट्रेनिंग.
- Film & Television Production: Acting plus behind-the-scenes skills.
2. Dance:
- Bachelor of Dance (B.Dance): Classical, contemporary, folk dance forms.
- Diploma in Dance: Bharatanatyam, Kathak, Hip-hop, Contemporary dance.
- Dance Therapy: Emotional आणि physical health साठी therapeutic वापर.
3. Painting:
- BFA in Painting: विविध techniques आणि mediums शिकायला मिळतात.
- Diploma in Painting: Basic techniques शिकवणारा शॉर्ट कोर्स.
- Art & Design: Digital media, illustration, graphic design एकत्र शिकायला मिळतं.
- for more information visit- (Shiksha)

4. Sculpture (शिल्पकला):
- BFA in Sculpture: Clay, metal, stone वापरून sculpture तयार करण्याचं प्रशिक्षण.
- Certificate in Sculpture: Short-term course for sculpting techniques.
- Public Art Design: Public spaces साठी sculpture design वर focus.
5. Photography:
- Diploma in Photography: Lighting, editing, composition यावर बेसिक कोर्स.
- B.A. in Photography: Art form म्हणून फोटो ग्राफीकला अभ्यास.

6. Graphic Designing:
- B.Des in Graphic Design: Logo design, typography, branding skills शिकवतो.
- Diploma in Graphic Design: Photoshop, Illustrator, InDesign सारखी software tools वापरणं शिकवतात.
7. Fashion Design:
- B.Des in Fashion Design: Design, fabric knowledge, marketing सर्वकाही.
- Diploma in Fashion Design: Pattern making, garment styling यावर focused course.
- for more information visit – (Hunar)
शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा: ही सर्व क्षेत्रं – Acting, Dance, Design, Media – आजच्या जगात खूप मोठं scope देतात. पण बऱ्याचदा योग्य माहिती नसल्यामुळे, आर्थिक अडचणी किंवा कौटुंबिक दबावामुळे मुलं गोंधळतात. त्यामुळे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी awareness ठेवणं खूप गरजेचं आहे.

वाणिज्य (Commerce):
जेव्हा गणिताचा विचार येतो, तेव्हा काही विद्यार्थ्यांना त्यातील संख्यांचा गोंधळ, समीकरणं, सूत्रं आणि चार्ट्स अधिकच गोंधळजनक वाटतात. त्यामुळे, फार कमी विद्यार्थी कॉमर्स क्षेत्रात करिअर करण्यासाठी उत्सुक असतात. तथापि, सुरुवातीला थोडीशी भीती वाटली तरी, कॉमर्स हा एक मजबूत करिअर पर्याय राहतो, ज्यामध्ये अनेक संधी आहेत. त्यासाठी, पारंपरिक आणि नवीन कोर्सेसच्या संधींचा विचार केला पाहिजे.
पारंपरिक कोर्सेस:
- B.Com (Bachelor of Commerce) : हा १०वी नंतरचा एक सर्वसाधारण आणि लोकप्रिय कोर्स आहे. या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना अकाउंटिंग, इकॉनॉमिक्स, बिझनेस लॉज आणि फाइनान्स यांची बेसिक माहिती मिळते.
- CA (Chartered Accountancy) : हे एक दीर्घकालीन, अत्यंत प्रतिष्ठित आणि फायद्याचे करिअर मार्ग आहे. ते अकाउंटिंग, ऑडिटिंग आणि टॅक्सेशन या क्षेत्रात रुचि असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगला पर्याय आहे.
- CS (Company Secretary) : हे एक अत्यंत आदरास्पद पद आहे. कंपनीच्या व्यवस्थापन, कायद्याचे पालन आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्समध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारा कोर्स.
- BBA (Bachelor of Business Administration) : बिझनेस मॅनेजमेंटमध्ये रुचि असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम कोर्स आहे, जो त्यांना मार्केटिंग, फाइनान्स आणि HR या क्षेत्रात करिअर करण्यास तयार करतो.
हे पारंपरिक कोर्सेस अजूनही लोकप्रिय आहेत आणि करिअरच्या काही ठोस संधी देतात.

नवीन, पथप्रदर्शक कोर्सेस:
- Digital Marketing : इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या वाढीमुळे डिजिटल मार्केटिंग हे एक नवे आणि वाढतं क्षेत्र आहे. हे SEO, SEM, कंटेंट मार्केटिंग आणि सोशल मीडियाचा वापर यावर आधारित आहे.
- Financial Analysis and Investment Banking : या क्षेत्रात जागतिक फाइनान्शियल मार्केट्सच्या वाढीमुळे फाइनान्शियल अनालिसिस आणि इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये करिअर संधी वाढल्या आहेत.
- E-commerce and Retail Management : ऑनलाइन शॉपिंगच्या वाढीमुळे ई-कॉमर्स आणि रिटेल मॅनेजमेंटचा अभ्यास महत्वाचा ठरला आहे. हे डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि ऑनलाइन बिझनेस स्ट्रॅटेजीजवर आधारित असतो.
- Data Analytics and Business Intelligence : Data Analysis आणि बिझनेस इंटेलिजन्स हे एक आकर्षक क्षेत्र आहे. यात डेटा विश्लेषण, डेटा व्हिज्युअलायझेशन आणि निर्णय घेणे यांचा समावेश आहे.
पारंपरिक कोर्सेस आजही चालू आहेत, परंतु या नवीन कोर्सेसने एक नवीन दिशा घेतली आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करण्याची संधी मिळते.
Science:
Science क्षेत्राकडे बऱ्याच विद्यार्थ्यांचं आकर्षण आहे, कारण या क्षेत्रात नवनवीन गोष्टी शिकायला आणि शोध लावायला मिळतात. पण यासाठी जटिल संकल्पनांचा आणि कठोर अभ्यासाचा सामना करावा लागतो. फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी यांसारख्या आव्हानात्मक विषयांमुळे विद्यार्थ्यांना त्रास होऊ शकतो. पण, तरीही सायन्स हा एक उत्तम पर्याय आहे. यात आपल्याला निसर्गाचा अभ्यास, तंत्रज्ञानातील प्रगती किंवा आरोग्यविषयक दृषटिकोनातून काम करण्याची संधी मिळते.

पारंपरिक कोर्सेस:
- B.Sc. (Bachelor of Science) : हा १०वी नंतर विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय लोकप्रिय कोर्स आहे. यात फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स आणि पर्यावरण शास्त्र या विषयांचा अभ्यास करता येतो.
- MBBS (Bachelor of Medicine, Bachelor of Surgery) : जर आपल्याला medical क्षेत्रात करिअर करायचं असेल, तर MBBS हा एक प्रतिष्ठित कोर्स आहे. या कोर्सद्वारे तुम्हाला विविध स्पेशलायझेशन मिळतात.
- BDS (Bachelor of Dental Surgery) : दंतचिकित्सामध्ये करिअर करू इच्छित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम पर्याय. यामुळे तुमचं भविष्य दंतचिकित्सक म्हणून सजवता येईल.
- BAMS (Bachelor of Ayurvedic Medicine and Surgery) : पारंपरिक आयुर्वेदिक औषधांवर लक्ष केंद्रित करणारा कोर्स.
- Pharmacy : औषधविज्ञान विषयात कोर्स करून, तुम्ही मेडिकल, फार्मसी किंवा ड्रग डेव्हलपमेंटमध्ये करिअर करू शकता.
हे पारंपरिक कोर्सेस अजूनही अनेक क्षेत्रांमध्ये लोकप्रिय आहेत आणि अनेक ठोस करिअर संधी देतात.
नवीन, पथप्रदर्शक कोर्सेस:
- Biotechnology : जिवविज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या समन्वयाने हे क्षेत्र जोरात वाढत आहे. यामध्ये हेल्थकेअर, अॅग्रीकल्चर आणि पर्यावरण संरक्षणाचे करिअर पर्याय आहेत.
- Genetics and Genomics : जेनेटिक संशोधन, जीन एडिटिंग आणि जनेटिक काउन्सलिंग यावर आधारित एक अत्याधुनिक आणि महत्वाचं क्षेत्र आहे.
- Environmental Science : जागतिक पर्यावरण समस्यांवर लक्ष देऊन सस्टेनेबल सोल्यूशन्स शोधणारा एक महत्वाचा विषय. यामध्ये पर्यावरणीय धोरण आणि संशोधन या क्षेत्रात करिअर संधी आहेत.
- Artificial Intelligence and Machine Learning : यामध्ये इंटेलिजेंट सिस्टिम्स बनवण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. यासाठी रोबोटिक्स, ऑटोमेशन आणि डेटा अॅनालिसिस यामध्ये उत्तम करिअर संधी आहेत.
- Nanotechnology : आण्विक किंवा अणु पातळीवर पदार्थाच्या मॅनिपुलेशनशी संबंधित एक अत्याधुनिक आणि भविष्यवादी क्षेत्र.
पारंपरिक सायन्स कोर्सेसने एक ठोस पाया तयार केला आहे, पण नवीन क्षेत्रे उभी झाली आहेत, ज्या विद्यार्थ्यांना अधिक संधी देतात. सायन्स एक चांगला पर्याय आहे, जो विविध करिअरच्या दृषटिकोनातून अनेक संधी देतो.

आधुनिक कोर्सेस (New Trends Setters) : –
पूर्वी सांगितलेल्या पारंपरिक आणि परिचित कोर्सेसशिवाय, अजून अनेक असे क्षेत्रे आहेत जे विद्यार्थ्यांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. विशेषतः जे विद्यार्थी विविध आवडी आणि करिअरच्या मार्गांचा अभ्यास करू इच्छित आहेत, त्यांच्यासाठी हे कोर्सेस उत्तम संधी देऊ शकतात. चला, पाहूया काही अतिरिक्त कोर्सेस जे विविध आणि रोमांचक करिअरच्या दार उघडू शकतात.
1. Animation आणि Multimedia:
- Animation (BFA in Animation, Diploma in Animation): डिजिटल मीडिया वाढल्यामुळे, ऍनिमेशन एक आकर्षक आणि फायदेशीर क्षेत्र बनलं आहे. विद्यार्थ्यांना फिल्म, टेलिव्हिजन, गेमिंग, आणि अॅडव्हर्टायझिंग यांसारख्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी मिळू शकते.
- Multimedia Design: ग्राफिक्स, व्हिडिओ आणि साउंडचा वापर करून डिजिटल प्लॅटफॉर्म्ससाठी आकर्षक कंटेंट तयार करण्यावर आधारित कोर्स. यामुळे कंटेंट क्रिएशन, अॅडव्हर्टायझिंग आणि वेब डेव्हलपमेंटमध्ये करिअर संधी उपलब्ध होतात.
2. Hotel Management:
• Bachelor of Hotel Management (BHM): हॉटेल इंडस्ट्रीमध्ये करिअर करायला इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आदर्श कोर्स. या कोर्समध्ये हॉटेल ऑपरेशन्स, कस्टमर सर्व्हिस आणि इव्हेंट मॅनेजमेंट शिकवले जाते. यामुळे हॉटेल मॅनेजमेंट, टुरिझम आणि ट्रॅव्हल यामध्ये संधी मिळतात.
3. Event Management:
• Diploma in Event Management: इव्हेंट मॅनेजमेंट हे एक वाढतं क्षेत्र आहे, ज्यामध्ये इव्हेंट्स, कॉन्फरन्सेस, वेडिंग्स आणि इतर कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांची मागणी आहे. यामुळे विद्यार्थ्यांना इव्हेंट्सची योजना, मार्केटिंग आणि अंमलबजावणी शिकता येते. हा एक उत्कृष्ट करिअर पर्याय आहे.
4. Aviation आणि Airline Management:
- Airline and Airport Management: एव्हिएशन क्षेत्रात रुची असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स आदर्श आहे. यामध्ये एअरपोर्ट मॅनेजमेंट, फ्लाइट ऑपरेशन्स आणि कस्टमर सर्व्हिससाठी संधी उपलब्ध होतात.
- Pilot Training: ज्यांना उड्डाणाची आवड आहे, त्यांच्यासाठी पायलट बनणे एक रोमांचक आणि पुरस्कृत करिअर पर्याय आहे.
5. Sports Management:
• Bachelor’s/Master’s in Sports Management: हा कोर्स स्पोर्ट्स इंडस्ट्रीमध्ये करिअर करायचं असलेल्यांसाठी आदर्श आहे. यामध्ये कोचिंग, टीम मॅनेजमेंट, स्पोर्ट्स मार्केटिंग आणि इव्हेंट कोऑर्डिनेशन यांसारख्या संधी मिळतात.
6. Digital Content Creation:
- Content Writing/Blogging: लेखनाची आवड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी, हे कोर्स कंटेंट लेखन, ब्लॉगिंग, SEO (Search Engine Optimization), किंवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून करिअर करायला मदत करू शकतात.
- YouTube Content Creation: यूट्यूबच्या वाढीमुळे, विद्यार्थ्यांना व्हिडिओ क्रिएशन, एडिटिंग आणि यूट्यूब चॅनेल चालवण्याच्या कोर्सेसमध्ये करिअर संधी मिळू शकतात.

7. Social Work:
- Bachelor of Social Work (BSW): समाजातील वंचित घटकांसोबत काम करून, समाजातील विविध समस्यांवर उपाय शोधण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम कोर्स आहे.
- Master of Social Work (MSW): हा advance course सामाजिक सेवा संघटना, NGOs आणि सरकारी संस्थांमध्ये उच्च-स्तरीय करिअर संधी उपलब्ध करतो.
8. Interior Designing:
• Bachelor of Design (B.Des) in Interior Design: या कोर्समध्ये कार्यात्मक आणि सुंदर इंटिरिअर स्पेस डिझाइन करण्याचं शास्त्र शिकवलं जातं. हा कोर्स घर, कार्यालय आणि व्यावसायिक जागांसाठी महत्त्वपूर्ण आहे.
9. Journalism आणि Mass Communication:
• Bachelor in Journalism and Mass Communication: मीडिया, जर्नालिझम, पब्लिक रिलेशन्स, फिल्म आणि न्यूज ब्रॉडकास्टिंग मध्ये करिअर करण्यासाठी हा कोर्स आदर्श आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या वाढीमुळे, या क्षेत्रात ऑनलाइन जर्नालिझम, सोशल मीडिया मॅनेजमेंट आणि डिजिटल कंटेंट क्रिएशन यांसारख्या आधुनिक करिअर संधी उपलब्ध होतात.
10. Urban Planning आणि Architecture:
- B.Arch (Bachelor of Architecture): या कोर्समध्ये इमारती आणि अन्य संरचनांचे डिझाईन करण्याचा अभ्यास केला जातो. अर्बन डेव्हलपमेंट, रिअल इस्टेट, आणि कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये आर्किटेक्ट्ससाठी मागणी आहे.
- Urban Planning: शहर आणि गावांच्या विकासाच्या अभ्यासावर आधारित कोर्स. यामध्ये जमीन वापर, पायाभूत सुविधा आणि सस्टेनेबिलिटीवर लक्ष केंद्रित केले जाते.
11. Language आणि Translation:
- Foreign Language Courses: फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, मँडरीन, किंवा जपानी यासारख्या भाषांचा अभ्यास केल्याने, आंतरराष्ट्रीय संबंध, पर्यटन, अनुवाद, आणि शिक्षण यामध्ये करिअर संधी मिळू शकतात.
- Translation and Interpretation: या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना व्यावसायिक अनुवादक किंवा इंटरप्रेटर बनण्यासाठी तयार केलं जातं. विशेषत: आंतरराष्ट्रीय सेटिंगमध्ये याचा उपयोग होतो.
12. Cybersecurity:
• Diploma in Cybersecurity: डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरामुळे सायबरसुरक्षा हे एक वाढतं क्षेत्र बनलं आहे. सायबरसुरक्षा तज्ञ संस्थांना सायबर धोके टाळण्यासाठी मदत करतात, जे डेटा प्रायव्हसी आणि सुरक्षा सुनिश्चित करतात.
हे अतिरिक्त कोर्सेस विविध आवडी आणि कौशल्यांसाठी आहेत. अनिमेशन, इव्हेंट मॅनेजमेंट, सायबरसुरक्षा आणि एव्हिएशन अशा क्षेत्रांत करिअरच्या संधी आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडी, सामर्थ्य आणि करिअरच्या उद्दीष्टांचा विचार करूनच निर्णय घ्यावा. आजकाल पारंपरिक किंवा नव्या क्षेत्रात आपला शोध घ्यायला अनेक संधी आहेत. तुम्हाला काय आवडतं ते निवडा, पर्यायांचा अभ्यास करा आणि पालक, शिक्षकांकडून मार्गदर्शन घ्या. प्रत्येक क्षेत्रात अनेक संधी आहेत, त्यामुळे घाई करु नका. माहिती गोळा करा आणि तुमच्या आवडीनुसार करिअर निवडा. योग्य मनोवृत्ती आणि समर्थनासह, तुम्ही तुमच्यासाठी सर्वोत्तम निर्णय घेऊ शकाल.
Good information 👍